Pune Deccan News : पुण्यात जुन्या वादातून अल्पवयीन विद्यार्थ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; डेक्कन नदीपात्रातील धक्कादायक घटना

Pune Deccan News Today : शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळील नदीपात्रात जुन्या वादाचा राग मनात धरून एका १६ वर्षीय विद्यार्थ्यावर कोयत्यासह धारदार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात संबंधित टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू … Read more

Pune metro line 3 : हिंजवडीकरांना वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा; सार्वजनिक-खासगी भागीदारीचा नवा अध्याय

pune metro line 3: पुणेकरांची आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमध्ये दररोज प्रवास करणाऱ्या लाखो आयटी कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपली आहे. माण आणि हिंजवडी आयटी पार्कला शिवाजीनगरशी जोडणाऱ्या पुणे मेट्रो मार्गिका क्रमांक ३ चे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. हा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी अर्थात पीपीपी (Public-Private Partnership) तत्त्वावर विकसित करण्यात आला असून, … Read more

Pune News marathi : लहान मुलांच्या पतंगावरून वाद; रविवार पेठेत ६७ वर्षीय वृद्ध महिलेला भाजीच्या छत्रीच्या लोखंडी स्टँडने मारहाण

पुणे : शहरातील रविवार पेठ परिसरात एका लहान मुलाच्या पतंगावरून दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातून भाजी विक्री करणाऱ्या महिलेने आणि तिच्या मुलीने एका ६७ वर्षीय वृद्ध शिक्षिकेला अश्लील शिवीगाळ करत भाजीच्या छत्रीच्या लोखंडी स्टँडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यांतर्गत (मीठगंज चौकी) गुन्हा दाखल करण्याची … Read more

Sinhagad road pune news : शिक्षणाचा ताण सहन न झाल्याने अल्पवयीन मुलगा घरातून बेपत्ता !

Sinhagad road pune news marathi  : शिक्षणात मन रमत नसल्याने आणि अभ्यासाचा ताण सहन न झाल्यामुळे एका १६ वर्षीय मुलाने घरात चिठ्ठी लिहून घर सोडल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता (Sinhagad road pune  )परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी पालकांच्या तक्रारीवरून आनंदनगर पोलीस चौकी (सिंहगड रस्ता पोलीस ठाणे) येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

Yerwada pune kidnapping news :येरवडा परिसरातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; अज्ञात इसमाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल

Yerwada pune kidnapping news : येरवड्यातील लक्ष्मीनगर परिसरातून २२ वर्षीय तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तरुणीच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमन आशिष राय (वय २५, व्यवसाय – ड्रायव्हर, रा. पांडू लमान वस्ती, गंगुबाई हिलजवळ, लक्ष्मीनगर, येरवडा, पुणे) यांनी दिलेल्या … Read more