Pune News marathi : लहान मुलांच्या पतंगावरून वाद; रविवार पेठेत ६७ वर्षीय वृद्ध महिलेला भाजीच्या छत्रीच्या लोखंडी स्टँडने मारहाण

पुणे : शहरातील रविवार पेठ परिसरात एका लहान मुलाच्या पतंगावरून दोन महिलांमध्ये जोरदार वाद झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या वादातून भाजी विक्री करणाऱ्या महिलेने आणि तिच्या मुलीने एका ६७ वर्षीय वृद्ध शिक्षिकेला अश्लील शिवीगाळ करत भाजीच्या छत्रीच्या लोखंडी स्टँडने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यांतर्गत (मीठगंज चौकी) गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली आहे.Pune News marathi

Pune News marathi नुरबानो भिकन शेख (वय ६७ वर्षे, रा. १२०९, रविवार पेठ, चतुःशृंगी माता मंदिर पाठीमागे, पुणे) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. नुरबानो या घरात पहिली ते तिसरीच्या लहान मुलांच्या शिकवण्या (क्लास) घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून विद्या आणि तिची मुलगी स्वीटी (पूर्ण नाव, पत्ता अज्ञात) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय? मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास फिर्यादी नुरबानो यांचा ९ वर्षांचा नातू गौस हा घराबाहेर पतंग ठेवून आत गेला असता त्याची पतंग कोणीतरी घेऊन गेले. बाहेर येऊन चौकशी केली असता, शेजाऱ्यांनी सांगितले की रस्त्यावर भाजी विकणाऱ्या महिलेच्या मुलाने पतंग नेली आहे. त्यामुळे नुरबानो यांनी भाजी विक्रेती विद्या हिच्याकडे जाऊन विचारणा केली. त्यावेळी विद्या हिने “मी माझ्या मुलाला विचारून सांगते,” असे उत्तर दिले.Pune News marathi

काही वेळाने विद्या आणि तिची मुलगी स्वीटी या दोघी फिर्यादी नुरबानो यांच्या घराखाली आल्या आणि त्यांनी आरडाओरड सुरू केली. “माझ्या मुलावर खोटा आरोप करतेस का?” असे म्हणत त्यांनी नुरबानो यांना अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली तसेच “पुन्हा भावावर आरोप केला तर बघून घेईन,” अशी धमकी दिली.

लोखंडी स्टँडने डाव्या हातावर प्रहार वाद वाढल्यानंतर विद्या हिने नुरबानो यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिची मुलगी स्वीटी हिने भाजीच्या गाड्यावर सावलीसाठी लावली जाणारी छत्री ज्या लोखंडी स्टँडमध्ये बसवली जाते, त्या लोखंडी स्टँडने नुरबानो यांच्या डाव्या हातावर जोरात वार केला. या हल्ल्यामुळे त्यांचा हात वर उचलणेही कठीण झाले. नुरबानो यांनी मोठ्याने आरडाओरड केल्याने दोन्ही आरोपी महिला तिथून पसार झाल्या.

Pune News marathi  घटनेनंतर फिर्यादी यांनी तात्काळ मीठगंज पोलीस चौकी गाठून हकीकत सांगितली. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी तातडीने ससून रुग्णालयात पाठवले. ससून रुग्णालयात प्राथमिक उपचार पूर्ण झाल्यानंतर नुरबानो शेख यांनी मीठगंज चौकी/खडक पोलीस ठाण्यात येऊन दिलेल्या जबाबावरून महिला पोलीस हवालदार योगिता बोडके (ब. नं. ९३६५) यांनी तक्रार नोंदवून घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment